आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून मास्टरस्ट्रोक मारला. गेले अनेक दिवस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी अटकळ बांधली जात होती. परंतु आज त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'ज्याने आमदारांना आसाममध्ये नेले त्याच्याकडून उपमुख्यमंत्री पदापेक्षा जास्त अपेक्षा होत्या असे मला वाटत नाही. परंतु भाजपमध्ये, आदेशानुसार- दिल्लीचा असो किंवा नागपूरचा-मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे... मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता असलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास सांगितले आहे. ही गोष्ट धक्कादायक आहे.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)