Indurikar Maharaj : लोकसभा निवडणूका जसजशाजवळ येत आहेत. तसतसे राज्यातील वातावरण पण तापू लागले आहे. जागा वाटप फायनल झाल्यावर प्रचाराला जोर चढणार आहे. त्यातच इंदूरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj ) राजकीय वक्तव्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. कीर्तनकारांनी ५ हजार रुपये जादा घेतले तर धंदा मांडला अशी टीका होते.मात्र राजकीय सभांना(Political Sabha) ५ कोटींचा खर्च केला जातो.त्याचे काय? असा रोकडा सवाल त्यांनी केला. माढ्यामधील कुंभेज गावात महाराजांचे किर्तन होते. किर्तनकारांच्या कार्यक्रमाला लोक येतात. राजकारण्यांच्या सभेला लोक आणली जातात. त्यांना पाण्याच्या बाटल्या- समोसे दिले जातात, असा चिमटा त्यांनी काढला. (हेही वाचा :Indurikar Maharaj Case: इंदोरीकर महाराज यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश, अपत्य प्राप्तीसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आज सुनावणी )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)