Illegal Encroachment: महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत. याआधी बनावट कागदपत्रांचा वापर करून अपंगत्व प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप पूजावर झाला होता. याबाबत तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आता पूजाच्या पुण्यातील निवासस्थानावरील बेकायदा अतिक्रमणाची बाबही समोर आली असून, त्याविरोधात बुधवारी कारवाई करण्यात आली. तिच्या निवासस्थानावरील बेकायदा बांधकाम प्रशासनाने हटवले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये पूजाच्या घराची सीमा भिंत तुटल्याचे दिसत आहे. दरम्यान, वादात अडकल्यानंतर, उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने पूजा खेडकरचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. खेडकरवर पुण्यातील पोस्टिंगदरम्यान विशेष अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही आहे. (हेही वाचा: Pune Crime: स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून 66 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)