स्वस्तात सोने घेण्यासाठी जर तुम्ही कोणावर विश्वास ठेवून त्यांना पैसे देत असाल तर सावधान कारण स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील एका व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एल. टी. मार्ग पोलिसांना या प्रकरणी यश आले आहे. ॲश्वर्ड विल्सन असे आरोपीचे नाव असून व्यापाऱ्याकडील 66 लाख 79 हजाराची रोख घेऊन तो पळून गेला होता. तक्रारदार आर. प्रदीपकुमार हे मूळचे कर्नाटकमधील रहिवासी असून त्यांचा सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय आहे. (हेही वाचा - Dombivli Shocker: मस्करी जीवावर बेतली, इमारतीमध्ये सफाईचे काम करणाऱ्या महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू - पाहा व्हिडिओ)
उज्ज्वल डुगलबरोबर या व्यक्तीने आर. प्रदीपकुमार यांच्याशी ओळख वाढवली. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. सहा महिन्यांपूर्वी उज्जवलने त्यांना दूरध्वनी करून काही सोन्याच्या फोटो पाठविले. तसेच त्याला सोने हवे आहे का ? विचारले. तसेच स्वस्तात सोने देण्याची तयारीही दर्शविली. त्यामुळे त्यांनी त्याला होकार कळवला होता. काही दिवसांनी त्याने त्यांना ॲश्वर्डचा मोबाइल क्रमांक देत त्याच्याकडे स्वस्तात सोन मिळेल असे सांगितले.
आर. प्रदीपकुमार ठरल्याप्रमाणे जानेवारी महिन्यांत मुंबईत आले. मुंबादेवी मंदिराजवळ त्यांना ॲश्वर्ड भेटला. तिथे त्याने त्याच्याकडील शुद्ध सोन्याचा नमुना त्यांना दाखवला. तपासणीत ते सोने खरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याने 1200 ग्रॅम वजनाची सोन्याची 12 बिस्कीटे देण्याची तयारी दर्शवत आर. प्रदीपकुमार यांच्याकडून रोख 66 लाख 79 हजार रुपये घेतले. त्यानंतर तो त्यांना घेऊन एका कार्यालयाबाहेर आला. पैसे घेतल्यानंतर सोन्याची लगड घेऊन येतो सांगून ॲश्वर्ड तेथून निघून गेला आणि परत आलाच नाही.