Dombivli Shocker: मस्करी जीवावर बेतली, इमारतीमध्ये सफाईचे काम करणाऱ्या महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू - पाहा व्हिडिओ

या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.

Dombivli Shocker: मस्करी जीवावर बेतली,  इमारतीमध्ये सफाईचे काम करणाऱ्या महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू - पाहा व्हिडिओ
Representational Image (File Photo)

डोंबिवलीत मित्रांसोबत मस्करी ही जीवावर बेतली आहे. मित्रासोबत मस्करी करत असताना एका महिलेचा इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली-कल्याण शीळ रोड वर घडली.  नगीनादेवी मंजिराम असे या महिलेचे नाव असून ती या इमारतीमध्ये सफाईचे काम करत असल्याची माहिती आहे.  डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोडवर विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करते. नगीनादेवी डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते.  या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. (हेही वाचा -  Baramati Accident News: बारामती येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू)

पाहा व्हिडिओ -

मंगळारी दुपारच्या सुमारास नगीनादेवी  तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसली असताना तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याच दरम्यान तिच्या सहकाऱ्याचा हात तिला लागला आणि तोल आणि होत्याचे नव्हते झाले.  याचवेळी तिच्यासोबत मस्ती करणारा बंटी नावाच्या तरुणाचाही तोल गेला, मात्र  त्याला आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी वाचवले. या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.  नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करते. नगीनादेवी डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2024 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).