मुंबईतल्या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ते अँड निलेश भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.  मुंबई मध्ये दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.  पत्रात लिहले आहे की ''मुंबई मध्ये लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होऊन देखील तुमच्या पक्षाला मराठी उमेदवार मिळत नसल्याचे कळते. अशा परस्थिमध्ये कोणी तरी कोणताही उमेदवार देण्या पेक्षा, सुरत लोकसभा प्रमाणे मुंबई मधील दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आपणास विनंती करत आहे.''

पाहा पत्र

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)