Hijab Ban in Chembur College: मुंबईमधील एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयातील बुरखा प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या या महाविद्यालयातील नऊ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, वर्गात नकाब, बुरखा आणि हिजाब घालण्यावर बंदी घालण्याच्या महाविद्यालयाच्या निर्देशाला आव्हान दिले आहे. हा निर्णय मनमानी आणि अवास्तव असल्याचे म्हटले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती ए.एस.चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहे.
वकिलामार्फत दाखल केलेल्या याचिकेनुसार, 1 मे रोजी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर बुरखा, नकाब, हिजाब, बॅज, कॅप, स्टोल यावर ‘ड्रेस कोड’ निर्बंध लादणारा एक नोटिस कम संदेश प्रसारित करण्यात आला. आता ही नोटीस रद्द करण्याची मागणी, द्वितीय/तृतीय वर्षाच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केली आहे. 13 मे रोजी याचिकाकर्त्यांनी कॉलेज व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांना नकाब, बुरखा आणि हिजाबवरील निर्बंध मागे घेण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: Hijab Ban For Degree Students: 'कॉर्पोरेट कंपन्या बुरखा परिधान करणाऱ्या महिलांना नोकरी देत नाहीत'; महाविद्यालयातील हिजाब बंदीचे चेंबूर कॉलेज व्यवस्थापनाकडून समर्थन)
पहा पोस्ट-
Mumbai News: Hijab Ban In City College Challenged In High Courthttps://t.co/7SrTNGcz8J#BombayHC #HijabBan #Mumbai #Mumbainews #Hijab #Chembur@UrviJM
— Free Press Journal (@fpjindia) June 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)