औरंगाबाद: अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Statue) अखेर क्रांती चौकात (Aurangabad Kranti chowk) विराजमान झाला आहे. पहाटे पाचच्या सुमारास पुतळा बसवण्यात यश आलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषाने पूर्ण परिसर दणाणून गेला होता. टीव्ही 9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार मागील 48 तासंपासून पुतळा बसवण्यात प्रयत्न सुरु होते. रात्री 10 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत अथक प्रयत्न करण्यात आले आणि अखेर या प्रयत्नांना यश आलं.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)