Bihar Shocker: 'मिळून साऱ्याजणी' विष प्यायल्या; चौघींपैकी एकीचा मृत्यू, तिघींची प्रकृती चिंताजनक, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

यातील एका मुलीचा गया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर तीन मुलींची प्रकृती चिंताजनक असून, त्या रुग्णालयात जीवाशी झुंज देत आहेत.

Bihar Shocker: 'मिळून साऱ्याजणी' विष प्यायल्या; चौघींपैकी एकीचा मृत्यू, तिघींची प्रकृती चिंताजनक, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात सांडा बाजार येथील चार मैत्रिणींनी रविवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांना तातडीने औरंगाबादला लागून असलेल्या झारखंडमधील हरिहरगंज येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना औरंगाबादच्या सदर रुग्णालयात पाठवण्यात आले. सदर रुग्णालयात त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. शेवटी डॉक्टरांनी त्यांना चांगल्या उपचारासाठी मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल गया येथे रेफर केले. यातील एका मुलीचा गया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर तीन मुलींची प्रकृती चिंताजनक असून, त्या रुग्णालयात जीवाशी झुंज देत आहेत. या चार पैकी दोन मुली बहिणी आहेत. या घटनेमागील कारण अद्याप समोर आले नाही. या मुली 18 ते 20 वयोगटातील आहेत. (हेही वाचा: Madhya Pradesh Shocker: ग्वाल्हेरमध्ये 17 वर्षीय तरुणीचे फेसबुक फ्रेंडकडून अपहरण; पीडितेवर सामूहिक बलात्कार, आरोपीला अटक)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2023 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).