Madhya Pradesh Shocker: ग्वाल्हेरमध्ये 17 वर्षीय तरुणीचे फेसबुक फ्रेंडकडून अपहरण; पीडितेवर सामूहिक बलात्कार, आरोपीला अटक

पीडितेने केलेल्या तक्रारी सांगितले की, ती फेसबुकच्या माध्यमातून मुख्य आरोपी रामू कुशवाहाच्या संपर्कात आली होती. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, 21 नोव्हेंबर रोजी ती तिच्या घरी परतत असताना तिला कुशवाहाचा फोन आला. ज्याने आपण तिला भेटायला येत असल्याचे सांगितले.

Madhya Pradesh Shocker: ग्वाल्हेरमध्ये 17 वर्षीय तरुणीचे फेसबुक फ्रेंडकडून अपहरण; पीडितेवर सामूहिक बलात्कार, आरोपीला अटक
Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेर जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्या फेसबुक मित्राने आणि इतर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Raped) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडितेने नोंदवलेल्या एफआयआरनुसार ही घटना 21 नोव्हेंबर रोजी घडली.

पीडितेने केलेल्या तक्रारी सांगितले की, ती फेसबुकच्या माध्यमातून मुख्य आरोपी रामू कुशवाहाच्या संपर्कात आली होती. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, 21 नोव्हेंबर रोजी ती तिच्या घरी परतत असताना तिला कुशवाहाचा फोन आला. ज्याने आपण तिला भेटायला येत असल्याचे सांगितले. (हेही वाचा -UP Shocker: 18 विद्यार्थिंनींचा लैगिंक छळ केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल, सरकारी शाळेतील धक्कदायक प्रकार)

दरम्यान, काही वेळानंतर कुशवाह त्याच्या दोन मित्रांसह अरविंद आणि छोटे खान एका एसयूव्ही कारमध्ये आले. त्यांनी पीडितेला आत येण्यास सांगितले. अरविंद हा आमदार अजब सिंग कुशवाह यांचा पुतण्या असल्याचे सांगितले जाते. पीडितेने दावा केला की, तिने कारमध्ये बसण्यास नकार दिला. परंतु तिघांनी तिला कारमध्ये ओढले आणि तेथून निघून गेले. ते एका निर्जन ठिकाणी गेले जेथे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिघांनी तिला बेशुद्ध अवस्थेत टाकून तेथून पळ काढला.

ग्वाल्हेरचे पोलिस अधीक्षक (एसपी) राजेश चनाडेल यांनी सांगितले की, पीडितेच्या वक्तव्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2023 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).