गेल्या काही दिवसांमध्ये अनेक लोकप्रतिनिधींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आता माहिती मिळत आहे की, शिवसेना खासदार संजय राऊत यांची आई, पत्नी, मुलगी आणि पुतणी असे कुटुंबातील चारजण बुधवारी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. घरातील सदस्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे या सर्वांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर चार जणांचे रिपोर्ट सकारात्मक आले. एमव्हीए सरकारमधील 12 मंत्री आणि विविध पक्षांच्या सुमारे 70 आमदारांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.

राज्यातील एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, केसी पाडवी, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन जाधव, पंकजा मुंडे, सुजय विखे पाटील, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वरुण देसाई, प्रवीण दरेकर अशा अनेक नेत्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)