CM Visited Control Room of Disaster Management Department: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश… https://t.co/6tJMg8yMa8 pic.twitter.com/iLY9rUWOve
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 8, 2024
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी @mybmc च्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत… pic.twitter.com/vwmY87MXRI
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)