समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण नेहमीच वाढते राहिले आहे. त्याची आकडेवारीही भयावह आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग आणि त्यावरील अपघाताचे प्रमाण हा नेहमीच चिंतेचा आणि चर्चेचा विषय राहीला आहे. यातच एक चिंताजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक बस चालक कानात हे फोन घालून मोबाईलवरच चित्रपट पाहतो आहे. बस सातत्याने लेन बदलते आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मनसे अधिकृत या एक्स हँडलवर म्हटले आहे की, समृद्धी महामार्गच नाही तर राज्यात कुठल्याही महामार्गावर बेदरकार वाहनचालकांवर कडक कारवाई व्हायला हवी. समृद्धी महामार्गावर अपघातांची जी मालिका सुरु आहे त्यावरून हे असे चालक किती धोकादायक आहेत ह्याचा अंदाज येतो. तेंव्हा अशा चालकांवर कारवाई करण्यासाठी आणि असं काही आढळल्यास लोकांना तात्काळ कारवाईसाठी एक विशेष यंत्रणा उभी करावी ही विनंती. दरम्यान, जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो @saurabhkoratkar या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)