देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्यांनी केलेल्या ट्विटमुळेही ते अनेकदा चर्चेत येतात. सध्या त्यांनी देवेंद्र फडवीस यांच्याबद्दल काढलेले कौतुकोद्गारही असेच चर्चेत आले आहेत. रोहित पवाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, MPSC च्या कक्षेबाहेरीलही सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता MPSC मार्फतच भराव्यात यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं.फडणवीस साहेबांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याची बाब त्यांच्याशी चर्चा करताना ठळकपणे जाणवते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)