नववर्षाची सुरूवात अनेकजण गणपती बाप्पाच्या दर्शनाने करतात. यंदा नववर्षाचा पहिला दिवस रविवार असल्याने अनेकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे पुण्यात प्रसिद्ध देवस्थान दगडुशेठ गणपतीच्या दर्शनाला तुम्ही जाणार असाल तर 31 डिसेंबरला बाप्पाचं दर्शन रात्री 1 वाजेपर्यंत घेता येईल आणि 1 जानेवारीला पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुलं राहणार आहे. सध्या कोविड 19 च्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर मास्क घालूनच मंदिरात जावं लागणार आहे. नक्की वाचा: Siddhivinayak Mandir Darshan Timings On New Year: नववर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी 'या' वेळेत खुलं असणार प्रभादेवीचं सिद्धिविनायक मंदिर!
पहा ट्वीट
नूतन वर्षाभिनंदन २०२३
शनिवार, दि. ३१ डिसेंबर २०२२
मंदिर रात्री १ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले राहील.
सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा !https://t.co/CW7Tnb7MzJ#shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya#shrimantdagdusheth#dagdusheth #dagdushethganpati pic.twitter.com/t2sqbjaXLz
— Shrimant Dagdusheth Ganpati (@DagdushethG) December 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)