महाराष्ट्रात आज 1,128 नवीन कोविड 19 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यासह एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 24,333 वर पोहोचली. मुंबईमध्ये आज 840 रुग्ण आढळले असून, एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 12,043 वर गेली आहे. महाराष्ट्रात शनिवारी ओमिक्रॉन व्हेरिएंट BA.5 चे आणखी 17 रुग्ण आणि BA.4 चे 6 रुग्ण आढळून आले आहेत. कस्तुरबा हॉस्पिटल सेंट्रल लॅबोरेटरीने 364 नमुने तपासले आहेत आणि त्यातील एक वगळता सर्व ओमिक्रॉन प्रकारातील आहेत. BA.2 आणि BA.238 सर्वाधिक आढळले आहेत (325/364: 89%). आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)