Mumbai Police: मुंबईतील एसी लोकल ट्रेनमध्ये(Mumbai AC Local) टीसीला मारहाण झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. आता त्यावर लोहमार्ग पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. एसी लोकल ट्रेनमध्ये टीसीला मारहाण (TC Assault)झाल्याची तक्रर बोरिवली रेल्वे पोलिसांकडे नोंदवम्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना शांतता बाळगूण कोठेही कायदा, सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. आहे. शनिवारी चर्चगेट ते विरार एसी लोकल ट्रेनमध्ये अवैध तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढलेल्यातीन प्रवाशांनी टीसीवर हल्ला केला होता. दंड भरा किंवा ट्रेन सोडा असे म्हटल्यावर प्रवाशांनी टीसीला धक्काबुक्की केली. यात टीसीचा शर्ट फाटला. शिवाय हाताला दुखापतही झाली होती. (हेही वाचा: Mumbai Local Train: लोकलमध्ये पुन्हा टीसीला मारहाण; दंड मागितला असता शिवीगाळ करत शर्ट फाडला (Watch Video))
पोस्ट पहा
Update 🚨🚨 pic.twitter.com/0b0C2nOkKK
— GRP Mumbai (@grpmumbai) August 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)