Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये(Mumbai Local) पुन्ही टीसीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. अवैध तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढलेल्या तीन प्रवाशांनी टीसीला मारहाण(TC Assaulted) मारहाण केली. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. जसबीर सिंग असे पीडित रेल्वे अधिकार्याचे नाव आहे. या घटनेत त्यांचा शर्ट फाटला, त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या प्रकरणी आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला आहे. त्याशिवाय दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. व्हिडीओ डब्यातील तीन प्रवाशांनी रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये एका आरोपीने टीसीला डब्याच्या दरवाजावर दाबून धरले आहे. (हेही वाचा:डोंबिवली: कोपर रेल्वे स्थानकात TC ला मारहाण करणारा प्रवासी अटकेत )
सिंग यांनी प्रवाशांना त्यांची तिकिटे दाखवण्यास सांगितल्यानंतर हा प्रकार घडला. कागदपत्रे अवैध असल्याचे समजल्यानंतर टीसीने त्यांना रेल्वेच्या नियमानुसार दंड भरण्यास सांगितले. त्यानंतर अनिकेत भोसले या प्रवाशाने सिंग यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिकाऱ्याने त्यांना पुढील स्थानकावर ट्रेनमधून उतरण्यास सांगितले, जे बोरिवली स्थानक होते, परंतु भोसले यांनी उतरण्यास नकार दिला. उलट आरोपी प्रवाशांनी सिंग यांना मारहाण केली. व्हिडिओमध्ये आरोपीने आधी टीसीचा पाठलाग केला आणि नंतर त्याला कोचच्या दरनाजावर धरून ठेवले. (हेही वाचा:Commuters Assault Ticket Checker: नाहूर रेल्वे स्थानकात ऑन-ड्युटी तिकीट तपासनीसला अज्ञात टोळक्याची मारहाण, गुन्हा दाखल)
व्हिडीओ पहा
Shirt Tore, Hand Injured: Mumbai Local Train TC Assaulted by 3 Men without Ticket When Asked for Fine- #Watch.
More Details: https://t.co/LvLu4ZWvaQ#ViralVideo #Viral #ViralNews #Mumbai #MumbaiLocalTrain pic.twitter.com/XTHNHrS8nG
— TIMES NOW (@TimesNow) August 17, 2024
या घटनेत आरोपी गटाने सिंग यांना अपशब्द वापरले आणि त्याचा शर्ट फाडला. माहिती मिळताच, जीआरपी आणि आरपीएफ पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रकरण हातात घेतले. आरोपी गटाला ट्रेनमधून बाहेर काढण्यात आले. त्यांनी जसबीर सिंग यांची माफी मागितली. त्यानंतर आरोपींनी लेखी माफीनामा लिहून दंड भरला.