मुंबई उच्च न्यायालयाने एका महिलेला आपल्या पंधरा वर्षीय मुलासग थाईलैंडवरुन भारतात येण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे हा मुलगा आपल्या वडिलांना तसेच भावा बहिणींना मिळू शकतो. यावेळी न्यायालयाने म्हटले की वैवाहिक विवादात मुलांना आपल्या संपत्ती प्रमाणे मानले जातो, हे या देशातील सर्वात कडवटपणे लढले जाणारे खटले आहेत. तसेच कोर्टाने पुढे म्हटले की, मुलाचे कल्याण तिच्या किंवा त्याच्यावरील पालकांच्या हक्कांपेक्षा महत्त्वाचे आहे. थायलंडमध्ये आईसोबत राहणाऱ्या आपल्या 15 वर्षांच्या मुलाला भेटण्याची मागणी करणारी याचिका एका व्यक्तीने केली होती.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)