भाजप-शासित महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सीमावादाच्या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यांना सांगितले की या विषयावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत दोन्ही राज्ये कोणताही दावा किंवा मागणी करणार नाहीत. शाह म्हणाले की, राज्यांच्या सीमा समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील प्रत्येकी तीन मंत्र्यांसह सहा सदस्यांची टीम तयार केली जाईल. प्रसारमाध्यमांना माहिती देताना शाह म्हणाले, राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखली जावी आणि कोणालाही त्रास होणार नाही याची खात्री करण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. हेही वाचा Cyber Attack Cases In India: भारतात सायबर हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ; यावर्षी देशभरात 12.67 लाख प्रकरणांची नोंद
#WATCH | Union Home Minister Amit Shah speaks on the Maharashtra-Karnataka border issue after his meeting with the CMs of the two States pic.twitter.com/3Sv80LgEbk
— ANI (@ANI) December 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)