महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक (Chairman of Maharashtra Legislative Council Election) आता 19 डिसेंबरला होणार आहे. यासाठी 18 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. मागील 2 वर्षांपासून विधानपरिषदेचं सभापती पद रिक्त आहे. नीलम गोर्हे या उपसभापती आहेत. त्याच सध्या विधानपरिषदेचं काम पाहत आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्ष पद भाजपा कडे असल्याने आता विधानपरिषद शिवसेना आपल्याकडे ठेवत गोर्हेंना प्रमोशन देणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
विधानपरिषद सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक १९ डिसेंबरला होणार.
♦️ इच्छूक उमेदवारांना उद्या १८ डिसेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. #WinterSession2024 #Maharashtra #Nagpur #LegislativeCouncil pic.twitter.com/Hp68pyf6RV
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)