बिहारमध्ये (Bihar) सुरू असलेल्या चर्चेदरम्यान महाराष्ट्रातही जात जनगणनेची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA) समावेश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची भेट घेण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. यावर आता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहे की नागपुरात भाजपला जातीनिहाय जनगणना करायची नाही कारण ते धर्माच्या आधारावर राजकारण करतात. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)