बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हेच लक्षात शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना 'भाऊबीज भेट' वितरित करण्यात येणार आहे. भाऊबीज भेट साठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या बाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा: Maharashtra: आता ऑनलाईन होणार कर्मचाऱ्यांच्या बदल्या; CM Eknath Shinde यांचा ऐतिहासिक निर्णय)
बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी ३७ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री @iAditiTatkare यांनी दिली. pic.twitter.com/KhksxrYkDz
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)