राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर समाजसेवक आण्णा हजारे यांच्याबाबत एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी, ‘या माणसाने (अण्णा हजारे) या देशाचे वाटोळे केले, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही.’ असे म्हटले होते. आता या पोस्टवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हजारे म्हणतात, ‘जर माझ्यामुळे देशाचे नुकसान झाले असे म्हटले जात असेल तर, मी असे अनेक कायदे केले आहेत, ज्याचा फायदा देशातील जनतेला झाला आहे. माझ्या काही आंदोलनांमुळे देशाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या काही कामगारांचे नुकसान झाले आहे, हे आपण नाकारू शकत नाही. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना माझ्यामुळे घरी जावे लागले, हे निश्चितच त्यांचे नुकसान होते आणि ते कदाचित ते सहन करू शकत नाहीत. त्यामुळे काही खोटे आरोप करून माझी बदनामी करणे हे त्यांचे काम आहे, पण काही फरक पडत नाही. मी वकिलाचा सल्ला घेईन आणि माझ्यामुळे देशाचे नुकसान झाले असे म्हणणाऱ्यांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करेन आणि वकिलाशी बोलल्यानंतर कुठे आणि कोणत्या प्रकारचा खटला दाखल करता येईल हे बघेन.’

अण्णा हजारे यांच्या या प्रतिक्रियेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये ते म्हणतात- ‘माझ्या ट्विट नी ह्यांना जाग आली, कोर्टात खेचतो ह्याला म्हणजे मला असे पत्रकारांना म्हणाले. चला झोपेतून तर उठले बघू उद्या पासून जागे राहतात का.’ (हेही वाचा: आदित्य ठाकरे यांचे एकनाथ शिंदेंना खुले आव्हान; म्हणाले- 'भाजपशी हातमिळवणी का केली यावर समोरासमोर चर्चा होऊ द्या')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)