राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) अचानक चक्कर येऊन पडले. त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात (J J Hospital) पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) मार्फत चौकशी करण्यात येत असलेल्या 100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात सध्या अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत तरी त्यांची प्रकृती बघता जेल प्रशासनाकडून त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)