आंगणेवाडीची जत्रा यंदा 2 मार्च 2024 दिवशी आहे. या जत्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने कोकणामध्ये दाखल होत असतात. भाविकांची गर्दी पाहता कोकण रेल्वे कडून 1 मार्च दिवशी एक विशेष ट्रेन चालवली जात आहे. लोकमान्य टिळक टर्मिनंस ते करमाली दरम्यान ही ट्रेन चालवली जाणार असून एलटीटी स्थानकातून  1 मार्चच्या रात्री 22.15 ला ट्रेन सुटेल दुसर्‍या दिवशी ही ट्रेन सकाळी वाजता पोहचणार आहे. तर पुन्हा 3 मार्च दिवशी करमाळी मधून  दुपारी 3.20 ला ट्रेन सुटेल ती मुंबईला एलटीटी स्थानकात 3.45 ला पोहचणार आहे. (नक्की वाचा: यंदा आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेला तुम्ही मालवण मध्ये कसे पोहचाल?).

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)