Aditya Thackeray On Pune Bypoll Election Results: आज पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यात महाविकास आघाडीचे नेते, रविंद्र धंगेकर यांना बहुमत मिळाले. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी धंगेकर यांच्या विजयानिमित्त खास ट्विट करत पुण्यातील जनतेचे आभार मानत धंगेकर यांचे अभिनंदन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, संविधान व लोकशाहीसाठी लढताना, मविआच्या रविंद्र धंगेकर जीं सारख्या सहकाऱ्याला निवडून दिल्याबद्दल मी पुणेकरांचे, कसबावासीयांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच संपूर्ण माविआ च्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)