Rescue Operation in Kalyan: ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळल्याने अनेक भागात पाणी साचलं आहे. तसेच पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. रुळावर पाणी साचल्याने कल्याण-कसारा दरम्यानची रेल्वे वाहतूक संपूर्ण ठप्प झाली आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच अनेक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. अशातचं कल्याणमध्ये विविध भागात पाणी साचल्याने अनके नागरिक अडकले आहेत. कल्याणमध्ये प्रशासनाकडून 30 नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने नागरिकांची सुटका करण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पहा व्हिडिओ -
कल्याणमध्ये प्रशासनाकडून 30 नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन!#Kalyan #MumbaiRains #MTShorts pic.twitter.com/MUWa4vlluq
— Mumbai Tak (@mumbaitak) July 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)