माजी पर्यावरणमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारचा समाचार घेतला. ‘राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून मेट्रो 6 च्या कारशेडसाठी कांजुरमार्गची जागा ‘एमएमआरडीए’कडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. ‘मुंबईवर पहिला वार करून मेट्रोची कारशेड पुन्हा आरे वसाहतीत नेण्यात यश मिळवल्यानंतर आता एका मेट्रो मार्गासाठी कांजुरमार्गचीच जागा निवडण्यात आली आहे. या शिंदे सरकारचा मुंबईवर एवढा राग का आहे’ असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
पहा ट्विट -
घटनाबाह्य सरकारचा मुंबईवर राग का?
कांजुरमार्ग येथील ४४ हेक्टरमधील १५ हेक्टर जागा मेट्रो-६ कारशेडसाठी देणार आहे. मग उरलेली जागा मिंधे सरकारने बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी ठेवली आहे का?
आमचे सरकार मेट्रोच्या चार लाईनचे कारशेड एकत्र करणार होते. यामुळे महाराष्ट्राचे १० हजार कोटी… pic.twitter.com/m3Agh3vsXV
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)