नागपूर (Nagpur) मध्ये 25 वर्षीय व्यक्तीचा वीजेचा शॉक (Electrocution) लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विद्युत वाहिनी मधून वीज चोरण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार 12 जानेवारीच्या रात्रीची आहे. जामथा भागात हा प्रकार झाला आहे. अंकूश राजेंद्र पटेल असं मृत व्यक्तीचं नाव असून तो श्रमिक नगर भागातील झोपडपट्टी मध्ये राहत होता. ट्रान्सफॉर्मर वर अडकून त्याचा मृत्यू झाला. सोमवारी त्याचा मृतदेह दिसल्याची माहिती अधिकार्‍याने दिली आहे.

पटेल याने माऊली नगर मधून तेल आणि वायर चोरली. ट्रान्सफॉर्मर बंद आहे असे वाटल्याने तो त्यावर चढला आणि वीजेचा त्याला झटका लागला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, मृत हा गुन्हेगार होता. त्याच्यावर हिंगणा आणि बेलतरोडी पोलिस ठाण्यात अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ट्रान्सफॉर्मरमधून तेल, वायर, लोखंड चोरण्यात त्याचा सहभाग होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)