छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्ती निमित्त आज सोशल मीडीयात शिवभक्तांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी झाला होता. महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. शिवरायांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी रोहित पवार, गिरीश महाजन, अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विधियुक्त राज्याभिषेकामुळे त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला खऱ्या अर्थाने कायदेशीर व सार्वभौम स्वरूप प्राप्त झाले. समाजामध्ये स्वातंत्र्य, स्वाभिमान व पराक्रमाची भावना निर्माण करणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ! छत्रपती शिवाजी… pic.twitter.com/YkaaYpYYYC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 6, 2024
किल्ले रायगडावर आज राज्याभिषेक होऊन 'शिवाजी महाराज' हे स्वराज्याचे छत्रपती झाले.
आजच्या या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!#ChhatrapatiShivajiMharaj #Raigad pic.twitter.com/WgxYzY35tC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 6, 2024
आपल्या सर्वांचे आराध्य दैवत,स्वराज्य संस्थापक #छत्रपती_शिवाजी_महाराज यांना मानाचा मुजरा..!
आपल्या सर्वांना #शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!#ShivRajyabhishek pic.twitter.com/l3N0f9PCQW
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) June 6, 2024
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमयी शुभेच्छा !#ShivrajyabhishekSohala pic.twitter.com/PdSEdPwoVL
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) June 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)