स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करुन आलेल्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) वध केला. हा दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहावा असा आहे. अफजलखानाचा (Afzal Khan) वध हा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) म्हणून साजरा केला जातो. तसेच शिवप्रताप दिनानिमीत्त शिवभक्तांनी सोशल मीडियावर शुभेच्छा शेअर केल्या आहेत.
।।तो आला नव्हता, त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता।।
शिवप्रताप दिन चिरायु होवो
दिनांक १० नोव्हेंबर १६५९#शिवप्रतापदिन#shivprtapdin#chatrapatishivajimaharaj pic.twitter.com/CCZSg0GETj
— Adv_Vikram Sawant Inamdar (@Vsawantinamdar) November 10, 2021
परफेक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय??
"साडेसहा फूट उंचीचा धिप्पाड अफजलखान मारायला ६ फुटाच्या तलवारीचा नाही तर ४ इंचाच्या वाघनखाचा उपयोग केला."
नियोजन अन युक्ती.....♥️🚩🙏#शिवप्रताप_दिन #प्रताप_गड pic.twitter.com/QF4gPRPmdD
— Abhijeet Shinde Sarkar (@Abhijeet_9090) November 10, 2021
१० नोव्हेंबर १६५९
आजचा शिवप्रताप दिवस म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाही सरदार अफजलखान याचा कोथळा बाहेर काढलेला सुवर्ण दिवस. याच दिवशी त्या सैतानाच्या शिवाजी महाराजांनी मुसक्या आवळल्या आणि स्वराज्याला त्याच्या छळापासून मुक्त केले.#शिवप्रतापदिन#शिवराय_असे_शक्तीदाता pic.twitter.com/b9owuLlCJV
— 🇮🇳 Shriram Lohote (@LohoteShriram) November 10, 2021
परफेक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय..?
"साडेसहा फूट उंचीचा धिप्पाड अफजलखान मारायला ६ फुटाच्या तलवारीचा नाही तर ४ इंचाच्या वाघनखांचा उपयोग केला."
नियोजन अन युक्ती ♥️🚩
शिवप्रतापदिन चिरायू होवो pic.twitter.com/UViadWVZSh
— Shrikant Bhosle (@shrikant_bhosle) November 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)