Shivrajyabhishek Din 2022: रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शरद पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, अजित पवार, पंकजा मुंडे, वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे, आदी नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला खास शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा - Shivrajyabhishek Din 2022 Wishes: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खास Images, Greetings, WhatsApp Status पाठवून आपल्या मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!)
शरद पवार -
शरद पवार यांनी 'स्वराज्यनिर्मितीच्या ध्येयाला मूर्तरुप देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे लोकराज्य प्रत्यक्षात आणले. स्वराज्य स्थापनेद्वारे जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन.' अशा शब्दांत राज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वराज्यनिर्मितीच्या ध्येयाला मूर्तरुप देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे लोकराज्य प्रत्यक्षात आणले. स्वराज्य स्थापनेद्वारे जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/npPUpoBoFI
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 6, 2022
सुप्रिया सुळे -
Remembering Chhatrapati Shivaji Maharaj on his #Coronation Day!#ShivrajyabhishekDin #ShivswarajyaDin https://t.co/9xhAKcuJZh
— Supriya Sule (@supriya_sule) June 6, 2022
अजित पवार -
राज्यातील जनतेला 'शिवराज्याभिषेक दिन' आणि 'शिवस्वराज्य दिना'च्या मनापासनं शुभेच्छा! छत्रपती शिवाजी महाराजांनी दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात, स्वाभिमानाचं, स्वराज्याचं बीज रुजवलं. शिवस्वराज्य निर्माण केलं. महाराजांना मानाचा मुजरा! pic.twitter.com/vqKkqXuFn8
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 6, 2022
देवेंद्र फडणवीस -
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन.
स्वराज्य दिले, स्वातंत्र्य दिले,
राजा कसा असावा, याचे धडे दिले,
वीरता दिली, साहस दिले, सर्वस्व अर्पण केले!
आमचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा..
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!#ShivRajyabhishekDin pic.twitter.com/NwLUPqCOyZ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 6, 2022
धनंजय मुंडे -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची घटना म्हणजे इतिहासातील केवळ एक नोंद नव्हे, तर सुवर्णाक्षरांनी लिहावा असा तो स्वतंत्र इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांना त्रिवार वंदन; तसेच सर्वांना #शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/QUUF3tVdJg
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 6, 2022
पंकजा मुंडे -
आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त सर्वांना शुभेच्छा.#शिवराज्याभिषेकदिन#ShivrajyabhishekDin pic.twitter.com/1o3ySgHaXS
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 6, 2022
वर्षा गायकवाड -
रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे, जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, आमचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेकदिनी मानाचा मुजरा.!
देशातील तमाम शिवप्रेमींनी #शिवराज्याभिषेक_सोहळा
च्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/GQJKOywhQE
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 6, 2022
धिरज देशमुख -
आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा, उत्साहाचा आणि उर्जेचा क्षण म्हणजे #शिवराज्याभिषेक दिन. यानिमित्ताने अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. त्यांच्या कार्यातून सत्मार्ग व धैर्याचा बोध घेऊन राष्ट्रहितासाठी कार्यबद्ध होऊया.#ShivSwarajyaDin pic.twitter.com/5vzZuccnjO
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) June 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)