Marathi Bhasha Din 2023 Wishes: आज सर्वत्र मराठी राजभाषा दिन मोळ्या उत्साहात साजरा होत आहे. ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेला खास मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिल्या खास शुभेच्छा -
ज्येष्ठ साहित्यिक तसेच ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आलेले मराठी भाषेतील अग्रगण्य कवी पद्मभूषण वि.वा.शिरवाडकर उर्फ #कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी शतश: प्रणाम....#मराठी भाषा गौरव दिवसाच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...#मराठी_भाषा_गौरव_दिवस pic.twitter.com/6bikbWXyFZ
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 27, 2023
देवेंद्र फडणवीस -
🚩जैसी दीपांमाझि दिवटी।
कां तिथीं माझि पूर्णिमा गोमटी।
तैसी भाषांमध्ये मर्हाटी । सर्वोत्तम।।#मराठीभाषागौरवदिन #Marathi #मराठी pic.twitter.com/IKgStcRRQR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 27, 2023
राज ठाकरे -
'... मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !' #मराठीराजभाषादिन #MarathiRajbhashaDin pic.twitter.com/a82MFIyveS
— Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2023
आदित्य ठाकरे -
'अभिमान' मराठी!
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते,कविश्रेष्ठ 'कुसुमाग्रज' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 27, 2023
धनंजय मुंडे -
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.#म #मराठी #मराठीभाषादिन pic.twitter.com/Pk9AKmX6IS
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 27, 2023
शंभूराज देसाई -
"जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी। किं परिमळांमाजि कस्तुरि।
तैसी भाषांमाजि साजिरी। भाषा मराठी।।"
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/cI02NgRPDB
— Shambhuraj Desai (@shambhurajdesai) February 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)