भाद्रपद शुद्ध पंचमी चा दिवस हा ऋषी पंचमी म्हणून साजरा केला जातो. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारामध्ये सुमारे42,000 महिलांकडून आरतीचे आणि अथर्वशीर्षाचे एकत्र पठण झाले आहे. India World Record कडून त्याची दखल घेण्यात आली असून त्यांनी प्रमाणपत्र दिल्याची माहिती खजिनदार Mahesh Suryawanshi यांनी दिली आहे.  गणेशोत्सवानिमित्त पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला भाविकांची मोठी गर्दी असते. या काळात बाप्पाच्या मंदिराला आकर्षक सजावट केली जाते. देशा-परदेशातून नागरिक बाप्पाच्या दर्शनाला येतात.

दगडूशेठ गणपती च्या दरबारात महिलांची  एकत्र आरती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)