लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक जातात. यामध्ये चरणस्पर्श आणि मुखदर्शन अशा दोन रांगा असतात. पण त्यामध्येही वशिला लावून येणार्‍यांची आणि सेलिब्रिटींना मिळणारी खास वागणूक पाहून सामान्यांवर अन्याय होत असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली आहे. सध्या लालबागच्या राजाच्या मंडपातील काही व्हिडीओ वायरल होत आहे ज्यातही अशाच प्रकारे सामान्यांना मिळणार्‍या वागणूकीवरून रोष व्यक्त केला जात आहे. लालबागच्या राजाच्या पायाजवळ एकीकडे सामान्यांंना धक्का मारून बाजूला केलं जात असल्याचं दिसत आहे तर अगदी पाठ वळताच बाजूला काहींना आरामात फोटो, सेल्फी क्लि करायला वेळ दिला जात असल्याचं दिसत आहे. यावरूनच अनेक नेटिझन्सने संताप व्यक्त केला आहे.

लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांसोबत भेदभाव ?

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)