कोविड नंतर आता पुन्हा सारं सुरळीत झाल्यानंतर गणेशोत्सवामध्ये तोच जल्लोष, दणदणाट पुन्हा पहायला मिळत आहे. लालबागच्या मार्केट मधून काल निघालेला लालबागचा राजा आज सुमारे 22-23 तासांनंतर विसर्जित होणार आहे. काही वेळापूर्वीच त्याचं गिरगाव चौपाटीवर आगमन झालं असून विशेष ताराफ्यात बसवून आता त्याचं खोल समुद्रामध्ये विसर्जन केले जाईल. लालबागच्या राजच्या विसर्जनाचा मान कोळी बांधवांचा असतो. विशेष बोटीने ते देखील आत मध्ये जातात. आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला जातो.

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)