Lalbaugcha Raja 2023 Photo: गणेश चतुर्थीच्या आधी घडले मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन; पहा बाप्पांच्या मूर्तीची पहिली झलक

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची विशेष ख्याती आहे, त्यामुळेच बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दररोज लाखो भाविक जमतात.

Lalbaugcha Raja 2023 Photo: गणेश चतुर्थीच्या आधी घडले मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन; पहा बाप्पांच्या मूर्तीची पहिली झलक
Lalbaugcha Raja 2023 Photo (Photo Credit : Insta)

गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी मुंबईसह देशातील प्रसिद्ध लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. आज संध्याकाळी बाप्पांच्या मूर्तीचे दर्शन घडले. ढोल-ताशांच्या गजरात भाविकांनी विघ्नहर्ताचे स्वागत केले. लालबागचा राजा या सार्वजनिक मंडळाला यावर्षी 90 वर्षे पूर्ण होत आहेत.यंदा लालबागच्या राजाच्या दारी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. तर रायगडावरील शिवराज्याभिषेकाचं दर्शन यावेळी लालबागच्या राजाच्या दरबारात होईल. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची विशेष ख्याती आहे, त्यामुळेच बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दररोज लाखो भाविक जमतात, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्सपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांचा सहभाग असतो. (हेही वाचा: Ganeshotsav 2023: GSB Seva Mandal, King's Circle चा यंदा विमा 360 कोटींचा; 66 किलो सोनं, 295 किलो चांदीने मढतो बाप्पा)

 

View this post on Instagram

 

A post shared by LalbaugchaRaja (@lalbaugcharaja)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2023 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).