महाराष्ट्रातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सांस्कृतिक कार्य विभाग स्पर्धा घेऊन पुरस्कार देणार देणार आहे. जिल्हा आणि राज्यस्तरावर होणार्या या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी pldeshpandekalaacademy.org वर 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यस्तरावरच्या प्रथम क्रमांकाला ५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी अडीच लाख आणि तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपयांचं पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे.
पहा ट्वीट
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक #गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतल्याची माहिती मंत्री @SMungantiwar यांनी दिली. राज्यस्तर आणि जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभागासाठी ३० ऑगस्टपर्यंत https://t.co/n75INvhr7k वर अर्ज करता येईल. pic.twitter.com/CKDec9ZE5k
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)