आई-वडीलांच्या लाडक्या लेकीसाठी एक दिवस समर्पित करण्यात आला आहे. तो म्हणजे 'राष्ट्रीय कन्या दिन'. भारतात सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी कन्या दिन साजरा करण्यात येतो. यंदा हा दिवस 26 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त Wishes, Messages, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इंस्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून आपल्या मुलीला द्या शुभेच्छा.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा:
मी नसेल आई दिवा वंशाचा
मी आहे दिव्यातील वात
नाव चालवेन कुळाचे बाबा
मोठी होऊनी जगात
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा!

लेक म्हणजे ईश्वराची देणं
लेक म्हणजे अमृताचे बोल
तिच्या पाऊलखुणांनी
सुख ही होई अनमोल
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा!

पोटातच मारले जाते ज्या गोंडस मुलीला
जन्मू द्या त्या चिमुकलीला
तिचं वाढवते तुमचा वंश
पाहा देवाची ही अजब लिला
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

लक्ष्मीच्या पायांनी जी घरात येते
जिच्या पैंजणांनी सारे घर निनादते
जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते
जिचे निखळ हास्य संपूर्ण घर झळाळून टाकते
हे सर्व सुख त्यांच्याच नशिबी येते
ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा!

कुणाची ती बहिण असते
कुणाची ती आई असते
कुणाची पत्नी, तर कुणाची सून असते
पण याआधी ती आई-वडिलांची लाडाची लेक असते
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)