मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी धूम असते. गल्लोगली विराजमान असलेले बाप्पा पाहण्यासाठी गणेशभक्त मोठी गर्दी करतात. यंदा 7 सप्टेंबरला गणपतींचं आगमन होणार आहे. तत्पूर्वी अनेक मोठे सार्वजनिक गणपतींचं आगमन मुंबईत गणेश चतुर्थी पूर्वीच केलं जातं. यंदा 31 ऑगस्टला चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होणार आहे. या गणपतीच्या आगमनाला गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असते. त्यापार्श्वभूमीवर चिंतामणीच्या भक्तांना सुरक्षित राहण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठीच्या सूचना मुंबई पोलिस दलाकडून करण्यात आल्या आहेत. नक्की वाचा: Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2024: 31 ऑगस्ट रोजी होणार चिंचपोकळीच्या 'चिंतामणी' चे आगमन, जाणून घ्या, कुठे पाहता येणार आगमन सोहळा .
चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन 31 ऑगस्टला
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)