गणेश  चतुर्थीचा सण अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपला आहे. 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी आज चिंचपोकळीच्या चिंतामणी चे आगमन झाले आहे. भाविकांना आज गणेशमूर्तीचं पहिलं दर्शन देखील झालं आहे. दक्षिण मुंबई मध्ये भाविकांनी गाजत वाजत मूर्तीच्या आगमन सोहळ्यात सहभाग नोंदवल्याचं पहायला मिळालं आहे.  दक्षिण मुंबई मध्ये भाविकांसाठी आकर्षण असलेल्या  चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन त्यांना 19 सप्टेंबर पासून पुढील 10 दिवस घेता येणार आहे. Mumbai Traffic Update: चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई भागात वाहतूकीमध्ये बदल; ट्राफिक पोलिस विभागाची माहिती .

 

पहा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं प्रथम दर्शन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)