Malharrao Holkar Jayanti 2024: इंदौर संस्थानाचे संस्थापक, सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती (Malharrao Holkar Jayanti 2024) सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मल्हारराव होळकर हे होळकर घराण्याचे संस्थापक होते.मल्हारराव होळकर यांचा जन्म 16 मार्च 1693 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळील होळ गावात एका धनगर कुटुंबात खंडूजी होळकर यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील 1696 मध्ये मरण पावले, तेव्हा ते फक्त तीन वर्षांचे होते. ते मल्हार राव तळोदा (नंदुरबार जिल्हा, महाराष्ट्र) येथे त्यांचे मामा सरदार भोजराजराव बारगळ यांच्या वाड्यात वाढले. आज मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भूजबळ, बाळासाहेब थोरात, अमित देखमुख आदी नेत्यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालून स्वराज्याचा कारभार नेटानं पुढे हाकणारे उत्तम प्रशासक, आपल्या शौर्यानं शत्रूला धडकी भरवणारे कर्तबगार सेनानी, इंदूर संस्थानचे संस्थापक, वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!#मल्हारराव_होळकर pic.twitter.com/GB5hLgg6AJ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 16, 2024
🚩🚩 मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरदार व इंदूर संस्थानचे संस्थापक वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏🏻#मल्हारराव_होळकर pic.twitter.com/DpSStZD1j3
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) March 16, 2024
कर्तृत्ववान योद्धा व महापराक्रमी, इंदौर संस्थानाचे संस्थापक, सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/XPgpQ4MRds
— Balasaheb Thorat (@bb_thorat) March 16, 2024
मुत्सद्दी राज्यकर्ते,इंदूर संस्थानचे प्रशासक श्रीमंत सुभेदार #मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!#MalharraoHolkar pic.twitter.com/zgcqwRRBhy
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) March 16, 2024
असीम पराक्रामाचे धनी, ध्येयनिष्ठ सुभेदार
श्रीमंत राजे मल्हारराव होळकर
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!! #Malharrao_Holkar pic.twitter.com/NcLppHh5nW
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) March 16, 2024
युद्धकलेत निष्णात, राज्यकारभारात हुशार व चाणाक्ष, आपल्या कामातून व अनुभवातून दबदबा निर्माण करणारे तसेच आपल्या कर्तबगारीच्या जोरावर देशाच्या इतिहासात नाव कोरणारे एक कर्तबगार सेनानी आणि इंदूर संस्थानचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/m1FZ5lTHBf
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)