West Bengal Fire: पश्चिम बंगाल (West Bengal)मधील हावडा (Howrah) येथे मोठा ताग(Jute) कारखाना आहे. दुपारच्या सुमारास कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (Fire fighters)पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. (हेही वाचा :Fire Erupts At Furniture Market In Goregaon: गोरेगावमधील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पाहा व्हिडिओ )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)