UP Crime: उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका मशिदित 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका मौलानाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपुर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहारातील कुरारा भागातील मशिदीत 28 वर्षीय मौलाना मुंताझीर आलम यांच्याकडून उर्दूचे वर्ग घेण्यासाठी मुलगी गेली असता ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीवर बलात्काराचा आणि पोस्को कायदार्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संधी साधून मौलानाने मुलीला एका खोली नेलं आणि बलात्कार केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर मौलाना घटनास्थळावरून फरार झाला. मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहचली. त्यानंतर पालकांना घटना सांगितली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, आरोपीला पकडण्यात आले.
#हमीरपुर में नाबालिग बच्ची से मौलाना ने किया रेप
मौलाना मुंतजिब आलम ने किया दुष्कर्म@hamirpurpolice ने आरोपी मौलाना मुंतजिब आलम को किया अरेस्ट
हमीरपुर के कुरारा थाना का मामला#Hamirpur @Uppolice pic.twitter.com/BReeYG9lYH
— Sudarshan UP (@SudarshanNewsUp) November 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)