Unnao News: उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील तुरुंगातील कैद्यांसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  कैद्यांनाही गंगा स्नान करण्यात यावे म्हणून तुरुंग प्रशासनाने कैद्यांना कुंभस्नान करण्याची व्यवस्था केली. सध्या महाकुंभ पर्व सुरु आहे. अनेक भाविक गंगा स्नान करण्यासाठी प्रयागराज येथे गर्दी करत आहेत. दरम्यान, उन्नाव येथील हे उपक्रम  सध्या चर्चेत आहे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाकुंभात सर्वांना सहभागी होता यावे या उद्देशाने हि व्यवस्था करण्यात आली होती.  तुरुंग प्रशासनाने तुरुंगाच्या आवारातच पवित्र स्नानाची सुविधा उपलब्ध करून दिली, जिथे कैद्यांनी गंगेच्या पाण्यात स्नान करून पवित्र स्नानाचा अनुभव घेतला. कैद्यांनी धार्मिक मंत्रांचा जप केला आणि पूजा केली. तुरुंग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या उपक्रमाचा उद्देश कैद्यांना आध्यात्मिक शांती देणे आणि त्यांना सुधारणांसाठी प्रेरित करणे आहे. कैद्यांनीही प्रशासनाचे आभार मानले आणि हा एक अनोखा अनुभव असल्याचे म्हटले.
येथे पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)