Karnataka Election 2023: या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. पक्षाने शनिवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कर्नाटकातील निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्यांच्यासोबत तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांना राज्याचे सहप्रभारी बनवण्यात आले आहे. याशिवाय भाजपने सिक्कीममधील पक्ष संघटनेतही फेरबदल केले आहेत. सिक्कीममध्ये पक्षाने डीआर थापा यांना प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. याशिवाय पक्षाचे आमदार एनके सुब्बा यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार डीटी लेपचा यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे.
Union Minister Dharmendra Pradhan appointed as the BJP's Incharge and Tamil Nadu BJP president K Annamalai appointed as the Co-Incharge for the upcoming #KarnatakaElection2023 pic.twitter.com/UZQIonyXdQ
— ANI (@ANI) February 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)