Air Asia Flight Emergency Landing: एअर एशियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. 168 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स घेऊन कोची ते बेंगळुरूला जाणारे एअर एशियाचे विमान कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच परतले. विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले की, रविवारी रात्री उशिरा बेंगळुरूसाठी रवाना झालेल्या कोची-बंगळुरू फ्लाइटमध्ये रात्री 11.15 वाजता टेक ऑफ झाल्यानंतर लगेचच तांत्रिक समस्या आली. नंतरच्या तपासणीत विमानात हायड्रॉलिक समस्या असल्याचे समोर आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)