बद्रीनाथ धाममध्ये मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांसह धार्मिक विधी आणि मंत्रोच्चार आणि लष्करी बँडच्या सुरांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे सकाळी 6 वाजता भाविकांसाठी उघडले. सध्या बद्रिनाथ परिसरामध्ये कडाक्याची थंडी आहे. मात्र, या थंडीतही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. कोरोना निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं यंदा बद्रिनाथ यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा बद्रिनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)