Hyderabad: तेलंगणातील हैदराबादमध्ये, एलबी नगर येथील कामिनेनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अलीकडेच एका ६६ वर्षीय रुग्णाच्या  अन्ननलिकेत अडकलेले मटनाचे हाड यशस्वीरित्या काढले. 'द सियासट डेली'च्या वृत्तानुसार, रुग्णाच्या हृदयाजवळील अन्ननलिकेमध्ये मटणाचे हाड अडकले होते.डॉक्टरांनी सांगितले की, मटणाच्या हाडामुळे वृद्ध व्यक्तीला एक महिन्यापेक्षा जास्त काळ अल्सरसह गंभीर जखमा झाल्या होत्या. श्रीरामुलू असे रुग्णाचे नाव असून तो कक्किरेन गावचा रहिवासी आहे. श्रीरामुलू यांना अन्न नीट गिळता  न आल्याने या समस्येचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. मटण खाताना त्यांनी चुकून 3.5 सेंटीमीटरचे हाड गिळल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला त्यांना गॅस्ट्रिकचा त्रास झाल्याचे निदान झाले. मात्र, कामिनेनी हॉस्पिटलमधील एन्डोस्कोपीमध्ये हाडांमध्ये अडथळा असल्याचे समोर आले.

पाहा पोस्ट:

Doctors at Kamineni Hospital, LB Nagar, successfully removed a mutton bone lodged in the esophagus near heart of a 66-year-old patient. The bone had caused severe complications, including ulcers, for over a month.https://t.co/nBFYK8o1FA

— The Siasat Daily (@TheSiasatDaily) May 14, 2024

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)